पुणे -प्रतिनिधी
घराबाहेर पडल्यानंतर पहिला व्हिडीओ‘बिग बॉस मराठी ६’(Bigg boss marathi) मधून सदस्यांना जीवे मारण्याची धमकी व तलवार चालवण्याची भाषा वापरल्याबद्दल दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आलं. मुंबईत पत्रकार परिषद घेत दिव्याने स्पष्टीकरण दिलं.‘तलवार शाब्दिक आहे’
“जे वैचारिक आहेत, त्यांच्यासाठी तलवार ही शाब्दिक, स्वाभिमानी, अभिमानाची आहे. संविधानिक देशात कोणी खरंच तलवार घेऊन जाईल? त्यांनी मला फोर्स केलं. मी १०० वेळा सांगितलं, मी बाहेर बोलणार नाही,” असं दिव्याने म्हटलं. ती भावुक झाली.इन्स्टाग्रामवर पहिला संदेश
घराबाहेर पडल्यानंतर इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ती म्हणाली, “नमस्कार जय भीम (Jay bhim), जय शिवराय (Jay shivray )! महाराष्ट्र, भारत व परदेशातील प्रेम व सपोर्टसाठी ऋणी. विषय संपला नाही, सुरू झालाय!”पत्रकार परिषदेनंतर दिव्याची पुढची वाटचाल काय, याकडे लक्ष लागलंय.
Bigg Boss : बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेने पत्रकार परिषदेत ‘तलवार’वर स्पष्टीकरण;
