Pune Crime : वेळेत चार्जशीट दाखल न केल्याने गुंड टिपू पठाण व टोळीला जामीन

पुणे -प्रतिनिधी 
कुख्यात गँगस्टर रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण (gund tipu pathan) व त्याच्या ५ साथीदारांना विशेष मोक्का न्यायालयाने जामीन दिला. पोलिसांनी ९० दिवसांत चार्जशीट दाखल न केल्याने आणि मुदतवाढ अर्ज वेळेवर न दिल्याने हा निर्णय झाला. न्यायाधीश एस एस कंठाळे यांनी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन (bail) मंजूर केला.
हडपसरमधील (hadpsar) १२९० चौ. मी. जमिनीवर जबरी ताबा घेऊन पत्र्याचे शेड उभारून भाड्याने देणे आणि २५ लाखांची खंडणी मागितल्याबद्दल काळेपडळ पोलिसांनी १० नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांना अटक केली होती. सहायक पीआय नम्रता देसाई यांच्याकडे तपास सुरू होता. पोलिसांनी ८९ व्या दिवशी मुदतवाढ अर्ज दिला, पण नोटिसा बजावल्या नाहीत आणि चुकीचा अहवाल सादर केला.न्यायालयाने कठोर अटी घातल्या. आरोपींनी पुणे शहरात ३ वर्षे किंवा खटला पूर्ण होईपर्यंत प्रवेश बंद ठेवावा. फक्त सुनावणी किंवा बोलावणीसाठी येणे. राहणीमान व संपर्क क्रमांक द्यावा. अटी भंग झाल्यास जामीन रद्द होईल. निकाल प्रत आयुक्त अमितेश कुमार यांना देण्याचे आदेश दिले. अॅड. बिलाल शेख (adv bilal shaikh) यांचा युक्तिवाद यशस्वी झाला.(pune crime)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *