Pune Mahanagarpalika : पुणे महापालिकेत जुन्यांचाच राज ? विरोधकांसह भाजपमधूनही आरोप

पुणे -प्रतिनिधी

२०१७ मध्ये पुणेकरांनी भाजपचे ९९ नगरसेवक निवडून दिले तरी महत्त्वाची पदे मोजक्यांपुरतीच राहिली. आता नव्या निवडणुकीत ११९ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपने पुन्हा स्थायी समिती व इतर विषय समित्यांवर जुन्याच चेहऱ्यांना प्राधान्य दिले आहे.शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवर भाजपचे १२, राष्ट्रवादीचे ३ आणि काँग्रेसचे १ सदस्य निवडले गेले. (Pune Mahanagarpalika)

शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण, विधी, क्रीडा व नाव समित्यांवर प्रत्येकी भाजपचे १०, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचे १ सदस्य नेमले गेले. एकूण ९४ नगरसेवकांची वर्णी, ज्यात ज्येष्ठ नेते गणेश बिडकर पुन्हा सभागृह नेते.स्थायी समितीवरील प्रमुख नावे: रूपाली धाडवे (Rupali dhaadave ), कालिंदा पुंडे (Kalinda Punde ), जयश्री भूमकर (भाजप) (jayshree Bhumkar BJP); अमोल बालवडकर (Amol Baalwadkar ), वैशाली बनकर (Vaishali bankar) (राष्ट्रवादी); प्रशांत जगताप (काँग्रेस) (Prashant Jagtap Congress). इतर समित्यांवरही अनुभवी सदस्यांची भर.या निवडींमुळे बहुसंख्य नगरसेवकांना मतदानाच्या वेळी केवळ हात वर करण्याचीच वेळ येणार असल्याची चर्चा महापालिकेत (Pune Mahanagarpalika)आहे. समिती अध्यक्षांची निवड आठवडाभरात होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *