Phaltan Doctor Women Sucide Case :फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण: बडतर्फ PSI गोपाळ बदनेचा जामीन फेटाळला

पुणे -प्रतिनिधी

फलटण (Phaltan) येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टराच्या आत्महत्येप्रकरणी संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. हे प्रकरण गेल्या वर्षी (२०२५) घडले असून, बदने व प्रशांत बनकर न्यायालयीन कोठडीत आहेत.

प्रकरणाची पार्श्वभूमीफलटणमधील डॉक्टराच्या आत्महत्येनंतर संशयित गोपाळ बदने (Gopal Badane ) (३५, मूळ रा. चांदापूर, बीड; हल्ली फलटण) व प्रशांत किसन बनकर (२९, फलटण) यांना अटक करण्यात आली. बदने याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. हे प्रकरण सातारा जिल्ह्यात मोठा वाद झाला होता. (Phaltan Doctor Women Sucide Case)

जामीन अर्जावर निर्णयबदने याने फलटण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर दोषपत्रातील प्रथमदर्शनी तांत्रिक पुरावे व युक्तिवादावरून अर्ज फेटाळला. आरोपी पक्षाने बाजू मांडली, तर सरकारी वकील वैभव काटकर (Advocate Vaibhav Katkar )व फिर्यादी वकील सदाशिव सानप (advocate Sadashiv Sanap )यांनी सरकारी बाजू तीव्रपणे मांडली. प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील सुनावणी लवकर होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *