पुणे -प्रतिनिधी
२८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लीयरजेट विमानाचा बारामती (Baramati) विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान भीषण (Accident) अपघात झाला. दुसऱ्या दिवशी रिकव्हर केलेला ब्लॅकबॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्याने तपासात मोठा अडथळा आला असून, केंद्र सरकार काही दिवसांत परदेश डेटा रिकव्हरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेणार आहे.(Ajit Pawar Acciden)
अपघातात अजित पवार (Ajit Pawar Accident )यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. विमान दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टीवर उतरताना नियंत्रण सुटले आणि शेतात कोसळून स्फोट झाला. ब्लॅकबॉक्समधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर व कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर जळाल्याने डेटा सुरक्षित आहे की नाही याचा तज्ज्ञ तपास सुरू आहे.आधुनिक तंत्रज्ञानाने काही डेटा वाचवता येईल असे तज्ज्ञ सांगतात. या माहितीमुळे अपघाताचे नेमके कारण उलगडेल आणि भविष्यातील दुर्घटना टाळण्यास मदत होईल. काहींनी अपघातावर शंका उपस्थित केल्याने चौकशी वेग घेत असून, पुढील काही दिवसांत अपडेट्स अपेक्षित आहेत (Ajit Pawar Acciden)
