Baramati Crime : बारामतीतील शिक्षकाचा इंजिनियरिंगच्या विद्यार्थिनींना अश्लील मेसेज, प्रतिसाद दे, नाहीतर ३० गुण … तसेच शिकवताना अंगाला चुकीचा स्पर्श अन्

पुणे -प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील माळेगाव येथील डिप्लोमा इंजिनीअरिंग महाविद्यालयातील प्राध्यापक नितीन शंकर तावरे (Principal Nitin Taware) (वय ४२, रा. सांगवी) यांच्यावर अल्पवयीन प्रथम वर्षीच्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर गुन्हा (Crime )दाखल झाला आहे. प्राचार्य संदीप रमेश शहा (Sandip Shah )यांच्या फिर्यादीवरून हा प्रकार उघडकीस आला असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे.(Baramati Crime)

तक्रारीनुसार, आरोपी प्राध्यापकाने २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विद्यार्थिनींना व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील संदेश पाठविले. प्रतिसाद न मिळाल्यास अंतर्गत मूल्यमापनातील ३० गुण न देण्याची धमकी देत होता. (Baramati Crime) वर्गात शिकवताना अयोग्य स्पर्श, जवळ जाण्याचा प्रयत्न आणि विरोध केल्यास अपमानास्पद वर्तन करत असल्याचेही नमूद आहे.

व्हॅलेंटाईन (Valentines ) वीकमध्ये गुलाब (Rose), टेडी बेअर, चॉकलेट्स देऊन सूचक वक्तव्ये करणे, असे प्रकारही त्याने केल्याचे समोर आले आहे. पीडित विद्यार्थिनी व पालकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली असून, पॉक्सो कायद्यांतर्गत (Pocso Law )तक्रार दाखल झाली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता वाढली असून, तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *