Khed : वडिलांसोबत पोहायला गेला अन् काळानं घाला घातला! 10 वर्षांच्या कैवल्याचा विहिरीत बुडून मृत्यू,

पुणे -प्रतिनिधी

खेड (Khed) तालुक्यातील घोटवडी गावाजवळ (Ghotwadi Gav ) दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय कैवल्य एकनाथ भोते याचा (रा. वाशेरे भोतेवाडी) विहिरीत बुडून मृत्यू (Death ) झाला. जलजीवन मिशन अंतर्गत खोदलेल्या ४० ते ५० फूट खोल विहिरीत वडील व भावासोबत पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा तोल जाऊन तो बुडाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली, तर पोलीस पाटलाने पोलिसांना कळविल्यावर अग्निशामक दल व आपत्कालीन बचाव पथक बोलावले गेले. मात्र, काल दुपारपासून आज दुपारपर्यंत प्रयत्न सफल होत नव्हते. याचवेळी वारंगवाडीतील नागरिकांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेशी संपर्क साधला, ज्यामुळे संस्थेचे अविनाश कार्ले व संस्थापक निलेश गराडे यांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

संस्थेच्या तत्काळ कारवाईमुळे शोधकार्य वेगवान झाले. अथक प्रयत्नांनंतर मुलाचा मृतदेह (Death body ) बाहेर काढण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी खेड पोलिसांच्या (Khed Police Station)ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, उन्हाळ्यात पोहण्याच्या वेळी पाण्याची खोली तपासावी व मुलांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *