पुणे -प्रतिनिधी
पुणे शहरातील कल्याणीनगर (KalyaniNagar) येथील हॉटेल पॉश मध्ये सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसानी छापा टाकलाय . आणि तीन महिलांची सुटका करण्यात आलीये . (Pune)
सुनिल साहेबराव कुर्हाडे ( Sunil Sahebrao Kurhade ) (वय ३५, रा. राहुलनगर, निगडी) असे या एजंटाचे नाव आहे. येरवडा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल ईलाईट स्टे या हॉटेलमध्ये तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली बातमीची पडताळणी केली बोगस ग्राहक पाठवून पोलिसानी खात्री केली ,यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या अधिकाऱ्यानी आणि कर्मचाऱ्यानी हॉटेल पॉश वर छापा टाकला . यावेळी त्या ठिकाणावरून तीन महिलाना ताब्यात घेण्यात आले
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्यांचे सांगितले .(Sex Racket)
ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, इम्रान खान नदाफ, अविनाशा कोडे, किरण बरडे, वैशाली खेडेकर, वैशाली इंगळे यांनी केली आहे.
