T -20 World Cup 2026 ; त्या तरुण क्रिकेटरचा घटस्फोट: चार वर्षांच्या लग्नाला पूर्णविराम

पुणे -प्रतीनिधी

भारतीय लेग स्पिनर राहुल चहर (वय २६) (Rahul Chahar) याने पत्नी इशिनी जोहर (Wife Ishani Johar ) यांच्याशी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेतला असून, इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करून ‘खूप लवकर लग्न केले, हा अध्याय मी बंद करतोय’ असे सांगितले .
मार्च २०२२ मध्ये गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग झाले असले तरी गेल्या १५ महिन्यांपासून कोर्टाच्या चकरा मारत भावनिक व आर्थिक नुकसान सहन करताना संयम शिकल्याचे त्याने नमूद केले .
राहुलने तरुण वयात लग्नाचा घाईचा निर्णय घेतल्यामुळे स्वतःची मूल्ये समजण्याची संधी मिळाली नसल्याचे सांगितले असून, आता स्वाभिमान व शांततेवर आधारित जीवन जगणार असल्याचे प्रतिपादन केले . चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super King ) आयपीएलसाठी सज्ज असलेल्या राहुलसोबत हार्दिक पांड्या, शिखर धवन व युझवेंद्र चहल यांचेही वैयक्तिक जीवनातील वादळ चर्चेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *