पुणे -प्रतीनिधी
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर ८ ला पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकानंतरच्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला असून, केशव महाराज ( Keshav Maharaj ) यांना कर्णधारपद सोपवले आहे (T-20)
. सध्या एडेन मार्कराम यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक खेळणाऱ्या संघातून बहुतांश खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून, केवळ केशव महाराज, जॉर्ज लिंडे व जेसन स्मिथ या तिघांना संघात स्थान मिळाले आहे.मालिकेचा पहिला सामना १५ मार्च रोजी न्यूझीलंडमध्ये खेळला जाईल व २५ मार्चपर्यंत चालेल, ज्यात इथन बॉश, कॉनर एस्टरहुइझेन, डायन फॉरेस्टर, जॉर्डन हरमन व न्कोबानी मोकोएना या अनकॅप्ड खेळाडूंना संधी देण्यात आली आहे (Cricket Team)
. विश्वचषकाचा अंतिम सामना ८ मार्चला होईल, त्यानंतर आयपीएल सुरू होण्यापूर्वी ही मालिका खेळली जाईल. भारताद्वारे सुपर ८ मधील २२ फेब्रुवारीचा अहमदाबाद सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
