पुणे -प्रतिनिधी
विमाननगर परिसरातील उच्चभ्रू रूट स्पा (Root Spaa ) सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवण्याच्या संशयाने पोलिसांनी सोमवारी छापा टाकला, या कारवाईदरम्यान धक्कादायक घटना घडली. स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि काचेचा दरवाजा तोडून आत शिरले. (Pune Crime)
पोलिस आल्याचे कळताच कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आणि एका महिलेने तसेच स्पा मॅनेजरने इमारतीच्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला.या उडीत महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मॅनेजर गंभीर जखमी होऊन जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. (Crime News)
पोलिसांनी तात्काळ परिसर सील करून पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. मृत महिलेची आणि जखमी मॅनेजरची ओळख पटविण्याचे काम सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. शहरात स्पा सेंटर्समधील अनैतिक व्यवसायावर पोलिसांची कडक कारवाई सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे विमाननगरात खळबळ उडाली आहे.(Spaa News )
