पुणे -प्रतिनिधी
पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या संख्येला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. गुगल मॅप्सला जोडलेली ‘ट्रॅफिक्युअर’ ही नवीन सॉफ्टवेअर प्रणाली रिअल टाइममध्ये शहरातील वाहतुकीची स्थिती समोर ठेवणार असून, कोंडी कमी करण्यासाठी तात्काळ निर्णय घेणे शक्य होईल.(Pune traffic)
या प्रणालीमुळे पोलिसांना संथ वाहतूक (TRaffic Police), जास्त कोंडी किंवा अपघात संभाव्य ठिकाणांची अचूक माहिती मिळेल, ज्यामुळे योग्य ठिकाणी कर्मचारी तैनात करता येतील आणि वाहतूक सुरळीत राहील. संपूर्ण शहर ५५० लहान विभागांमध्ये विभागले गेले असून, जानेवारी-फेब्रुवारीत ४५ दिवस चाचणीदरम्यान मुख्य रस्त्यांवर वाहनांचा सरासरी वेग २६.८ किमी प्रति तास नोंदवला गेला.
चाचणी यशस्वी झाल्याने आता ही प्रणाली पूर्ण क्षमतेने लागू होत असून, पुणेकरांना कोंडीत अडकण्याचा त्रास कमी होईल आणि आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्ग सुचवणे सोपे जाईल. या उपक्रमाने वाहतूक नियंत्रणात डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे (pune)

0000000000)
या प्रणालीमुळे पोलिसांना संथ वाहतूक, जास्त कोंडी किंवा अपघात संभाव्य ठिकाणांची अचूक माहिती मिळेल, ज्यामुळे योग्य ठिकाणी कर्मचारी तैनात करता येतील आणि वाहतूक सुरळीत राहील. संपूर्ण शहर ५५० लहान विभागांमध्ये विभागले गेले असून, जानेवारी-फेब्रुवारीत ४५ दिवस चाचणीदरम्यान मुख्य रस्त्यांवर वाहनांचा सरासरी वेग २६.८ किमी प्रति तास नोंदवला गेला.
चाचणी यशस्वी झाल्याने आता ही प्रणाली पूर्ण क्षमतेने लागू होत असून, पुणेकरांना कोंडीत अडकण्याचा त्रास कमी होईल आणि आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी मार्ग सुचवणे सोपे जाईल. या उपक्रमाने वाहतूक नियंत्रणात डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे
