पुणे – प्रतिनिधी
सिग्नलवर वाहनचालकांचं लक्ष विचलित करून मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या ‘टक-टक’ गँगचा पुणे गुन्हे शाखेने (युनिट-1) पर्दाफाश केला. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, फरासखाना, अलंकार आणि विमाननगर भागात अनेक चोऱ्यांची कबुली त्यांनी दिली.घटना सिग्नल किंवा गर्दीच्या ठिकाणी घडत होत्या.(Stay Alert) आरोपी चारचाकी वाहनावर ‘टक-टक’ करत चालकाचं लक्ष वेधत,(Tak Tak Gang)धडकेचा बहाणा करून वाद घालत आणि त्याचवेळी कारमधून मोबाईल, रोख रक्कम चोरत.(Pune Police)
फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजची (Pune Crime Branch) छाननी करत पोलिसांना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉजमधील मुक्कामाची माहिती मिळाली.गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून पोलिसांनी अटक केली. आरोपी ओमप्रकाश कोहली (३८, मेरठ) आणि अफझल कय्युम अब्बासी (३८, मेरठ) हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.(Pune News) चौकशीत कर्वे रोडवर आयफोन आणि रोख रक्कम चोरी, विमाननगर चौकात ‘गाडी पायावर गेली’ असा बहाणा करून सॅमसंग व वनप्लस मोबाईल लंपासल्याची कबुली मिळाली.पोलिस निरीक्षक अजित जाधव आणि पथकाने ही कारवाई केली.(Police Action) आरोपींना फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून, पुढील तपास सुरू आहे.(Signal Theft)
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, श्री. शैलेश संखे मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक अजित जाधव, पोलीस अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, निलेश साबळे, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, म. पोलीस अंमलदार ज्योती मुल्का, चा. पो. अंमलदार प्रफुल शेलार यांनी केली.
