पुणे – प्रतिनिधी
शहरात सलग चौथ्या दिवशी विजेच्या प्रचंड कडकडाट, (Pune Rains) वादळी वारे आणि अवकाळी मुसळधार पावसाने कहर माजवला. दीड ते दोन तास झालेल्या या पावसात शहर तर ठप्प झालेच पण पु.ल. देशपांडे उद्यानाजवळील नवश्या मारूती परिसरात झाड टपरीवर कोसळून एका फुल विक्रेत्या महिलेचा दुर्दैवी देखील झाला. (Unseasonal Rain )दुसरीकडे पुण्यातील प्रमुख रस्त्यासह काही भागाला नद्यांचे स्वरूप आले होते.(Tree Fall ) अग्निशमन दल, पुणे पोलिस पालिका प्रशासनाने रस्त्यावर उतरून साचलेले पाणी काढण्यासोबतच रस्त्यावरून झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान यात वाहतूक संत गतीने सुरू झाली होती.(Woman Death)
सोमवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने गुरुवारी जोरदार हजेरी पावली. दुपारी २ वाजता सुरू झालेल्या पावसाने केडवीनगर, बाणेर रस्ता, बालाजीनगर, विश्रांतवाडी, स्वारगेट, कोथरूड, धायरी, वाकड, हडपसर, वारजे, ढंकेवाडी येथे गुडघाभर पाणी साचले. मुख्य रस्त्यांवर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, (Water logging Pune )वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे . दांडेकर पुलाजवळ पिंपळ, सहवास हॉलजवळ कडुलिंब असे १० हून अधिक झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे .व वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे दरम्यान सिंहगड रोड, पाशन रोड, नाना पेठेत पाणी साचून मोठ्या वाहतूक कोंडीचे दृश्य पाहायला मिळाले . रस्त्यावर नदीचे स्वरूप पाहायला मिळत असल्याने चालकाचे प्रचंड हाल होत आहेत .
महापालिकेच्या माहितीनुसार, शहरात १५ ठिकाणी झाडपड, ८ ठिकाणी वीज खंडित झाली. एमएसआरटीसी बससेवा ठप्प, ऑटो रिक्षा बंद. बाणेर-आंडुरी, अण्णासाहेब मगार रोड, बिबवेवाडी येथे पाणी साचून शाळा-कॉलेजांना सुट्टी घोषित. नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन आहे.
हवामान विभागाने पुढील ६ तास जोरदार पावसाची शक्यता सांगितली असून, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने हेल्पलाइन १०२८ जाहीर केली आहे. पावसामुळे पुण्यातील जीवन ठप्प झाले असून, नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
