Pune Accident : पुण्यात ३५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात

पुणे:प्रतिनिधी

काळेपडळ परिसरात (Kalepadal Accident ) साधना विद्यालयाची स्कूल व्हॅन (Sadhan School)चालकाचे नियंत्रण सुटल्याने लाइट पोलला धडक देऊन भीषण अपघात झाला.(School VanCrash) या दुर्दैवी घटनेत बस चालक अमोल विनायक बोराटेसह चार विद्यार्थी जखमी झाले असून, काळेपडळ पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास म्हसोबा चौकात घडलेल्या या अपघातात व्हॅनमध्ये ३०-३५ विद्यार्थी (आठवी ते दहावी) होते. घरी सोडण्याच्या प्रवासात चालकाचे हात चक्काचूर झाले आणि जोरदार धडकेत बसचा पुढील भाग तुटला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून जखमींना रुग्णालयात नेले, ज्यात एका विद्यार्थ्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.(Pune School Bus)

पोलिस कारवाई आणि तपास
काळेपडळ पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवला. क्रेनने व्हॅन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. चालकाचा जास्त स्पीड कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात निदान झाले असून, शाळेच्या व्यवस्थापनाकडूनही जबाब घेतला जात आहे.

या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता वाढली असून, स्कूल व्हॅनच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *