पुणे, ३ एप्रिल २०२६:
पुणे पोलिसांनी सलग ११ दिवस ‘ऑपरेशन फ्लश आउट’ राबवून अवैध धंदे वाल्यांचे (दारू अड्डे) कंबरडे मोडले आहे. पोलिसांनी तब्बल १६६ गुन्हे नोंदविले आहेत. पोलिसांनी २० ते ३१ मार्च ही कारवाई केली आहे.(Pune Police)
पुण्याच्या चहुबाजूंनी गुन्हेगारीने विळखा घातला आहे. गुन्हेगारी सोबत अवैध धंदे देखील वाढले आहेत. सातत्याने ड्रग्ज विक्री, अवैध दारू अड्डे तसेच शस्त्र बाळगळे असे प्रकार दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील हे प्रकार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष करून आयुक्तांनी दारू अड्डे, अवैध शस्त्रे आणि ड्रग्ज या विरोधात ‘ऑपरेशन फ्लश आउट’ ही मोहिम सुरू केली. शहरातील सर्वच भागात २० ते ३१ मार्च या ११ दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.(OperationvFlashvOut )
चौकट
पोलिसांनी गेल्या ११ दिवसात आर्म्स ॲक्ट अंतर्गत एकूण २९ गुन्हे दाखल केले आहेत. तर अमली पदार्थांविरोधात (एनडीपीएस) १३ गुन्हे नोंद झाले आहेत.
चौकट
पोलिसांनी अवैध दारू प्रकरणात मोठी कारवाई करून “दारूबंदी कायद्यांतर्गत” तब्बल १६६ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, १३४ आरोपींवर कारवाई केली. यामध्ये पावणे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये २१९९ लिटरपेक्षा अधिक गावठी दारू, १०८ लिटर विदेशी दारू, ताडी, रसायन तसेच १३३७ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
—चौकट—
हातगाडीवर दारू ढोसणाऱ्यावर कारवाई
पोलिसांनी अवैध दारूसोबत
सार्वजनिक ठिकाणी दारू ढोसणाऱ्यावरही कारवाई केली. महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत १९५ हातगाड्यांवर आणि व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
