Pune : ड्रग्ज विरोधात पुणे पोलिस ॲक्शन मोडमध्ये, विकणारेच नाही तर सेवन करणारेही अडकणार, थेट आता मकोका

पुणे -प्रतिनिधी

शहरात वाढत्या ड्रग्सच्या विळख्याविरुद्ध पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आता ड्रग्स विक्रेत्यांवरच नव्हे तर सेवनकर्त्यांवरही MCOCA (महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हे कायदा) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.(Pune Police) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले, “ड्रग्स पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सेवनकर्त्यांनाही मजा म्हणून वाटणार नाही”.(Drug Crackdown)

रणनीतीत बदल, मोठ्या माशांकडे लक्ष

आतापर्यंत साध्या NDPS कायद्यांतर्गत कारवाई होत होती. आता MCOCA लावल्याने आरोपींना जामीन मिळवणे कठीण होईल आणि किमान चार वर्षे तुरुंगवासाची शक्यता आहे. (Anti Drugs )अल्पवयीन अपहरणप्रकरणातून उघडलेल्या रॅकेटसारख्या प्रकरणांमधून ३०० हून अधिक सेवनकर्ते रडारवर आले आहेत.(Pune Crime) विशेष पथके तयार करून गुप्त माहितीच्या आधारे सापळे रचले जात आहेत.(Drug Peddlers)

सेवनकर्त्यांनाही कायद्याचा बडगा

“मजा म्हणून” ड्रग्स घेणाऱ्या तरुणांना आता कठोर धक्का बसणार आहे. (Maharashtra rime)आयुक्त अमितेश कुमार यांनी २१ सेवनकर्त्यांची झाडाझडत घेत पॅटर्न समजून घेतला असून, उघडकीस आलेल्या माजी उपसरपंचासारख्या प्रकरणांमुळे समाजात भीतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्समुक्ती मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई तीव्र होत आहे.(Say No ToDrugs)

नागरिकांना आवाहन

पोलिसांनी नागरिकांना ड्रग्स माहिती तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे. “समाजाच्या सहकार्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही,” असे आयुक्त म्हणाले. येत्या काळात मोठ्या कारवाया अपेक्षित असून, पुणे ड्रग्समुक्त करण्याचे ध्येय गाठले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *