पुणे – प्रतिनिधी
ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइटवरून (Matrimonial Scam) ओळख झालेल्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून इंदोर येथील महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात उघडकीस आला. (Pune Crime )आरोपी प्रशांत प्रकाश चव्हाण (४२, रा. फुरसुंगी) (Prashant Chavan) सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.(Hadapsar Police )
पोलिस माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आरोपीशी मॅट्रिमोनियल साइटवर ओळख झाली. आरोपीने गोड बोलणी, काळजी आणि लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास जिंकला. यावर विश्वास ठेवून तिने इंदोरमधील नोकरी सोडली आणि पुण्यात आली. आरोपीने तिला स्वतःच्या हॉटेलमध्ये काम आणि राहण्याची सोय केली. ती सुमारे चार-पाच महिने तिथे राहिली.
या काळात आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि मानसिक दबाव टाकून गैरफायदा घेतला, असा आरोप आहे. पगार वाद झाल्यावरही लग्नाचे आमिष दाखवत राहिला. मात्र, नुकतेच लग्न नाकारून तिच्यापासून दूर झाला. फसवणुकीची जाणीव होताच तिने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.(Marriage Fraud )
या प्रकरणात चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाला असून, लवकरच अटक होईल, असा पोलिस विश्वास आहे. या घटनेमुळे ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइट्सवरील फसवणुकीचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले.(Women Safety) पोलिसांनी अनोळखींवर विश्वास टाळा, वैयक्तिक माहिती सावधगिरीने द्या आणि संशयास्पद वर्तन दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन केले आहे.
