Pune : हडपसर येथे गावठी पिस्टल व जिवंत काडतुस बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

पुणे: प्रतिनिधी

हडपसर परिसरातील फुरसुंगी पोलीस स्टेशन स्टेशनच्या हद्दीत (Fursungi Arrest) बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट सहाच्या (PuneCrimeBranch)पथकाने सापळा रचून अटक केली आहे .आरोपीकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस असा ४१,२०० मुद्देमाल जपत करण्यात आला आहे.

आरोपीचे नाव प्रभात शांताराम आंबेकर (PrabhatAmbekar) (२६, रा. साबळेमळा, वडकीनाला) असे आहे .

 

View this post on Instagram

 

Shared post on

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ एप्रिलला हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलीस हवालदार अमित कांबळे यांना गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठाच्या मार्गदशनाखाली पथकाने (CountryPistol)तात्काळ कारवाई करून पथकाने संशयिताला पकडले आणि अंगझडतीत अवैध शस्त्रे मिळून आली (GunSeizure). फुरसुंगी पोलीस स्टेशनला गु.र.नं. १७१/२०२६ अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) व मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३)सह १३५ नुसार गुन्हा दाखल केला.(CrimeNews)

ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, मा. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ व मा. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (PunePolice)यांच्या मार्गदर्शनाखाली पी.नि. सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रमोद टिळेकर, बाळासाहेब सकटे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे, गणेश माने, उमेश शेलार) यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *