Meera Borwankar : राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS मीरा बोरवणकर , सूत्राची माहिती

पुणे -प्रतिनिधी

महिलांवरील अत्याचार वाढत असताना रिक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (MeeraBorwankar ) यांची ४ मे रोजी निवड करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे (WomenCommissionChai).. ‘रुपाली चाकणकर यांच्या मार्चमधील राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते, ज्यामुळे तक्रारींचे निवारण रखडले होते. बोरवणकर यांच्या धडाकेबाज कारकीर्दीमुळे महिलांच्या सुरक्षेला गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

धाडसी कारकीर्द व जबाबदाऱ्या
मुंबई क्राईम ब्रँच व पुणे पोलिस आयुक्त म्हणून मोठमोठ्या गुन्ह्यांचा खात्मा केलेल्या बोरवणकर यांना कौटुंबिक हिंसा, छळ, भेदभाव प्रकरणांमध्ये जलद हस्तक्षेप, पोलिस-प्रशासन समन्वय व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आहे.(IPSMeeraBorwankar) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व आमदार रोहित पवार यांच्या मागणीनुसार बिगरराजकीय आयपीएस अधिकाऱ्याची निवड झाली.

राजीनामा व ‘मॅडम कमिशनर’ पुस्तक वाद
रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणातील फोटो वादानंतर राजीनामा दिला. बोरवणकर यांनी २०२३ मध्ये प्रकाशित ‘मॅडम कमिशनर’ (MadamCommissioner)पुस्तकात अजित पवारांवर येरवडा पोलिस स्टेशन जमिनीच्या लिलावाबाबत अप्रत्यक्ष आरोप केले होते, ज्यामुळे राजकीय खळबळ उडाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *