बारामती: प्रिया गायकवाड
नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी सहा अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले,(NasrapurUpdate ) ज्यात दोन महिला अधिकारी आहेत. रविवारी आरोपी भिमराव कांबळे याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असून घटनास्थळ सील करून युद्धपातळीवर पुरावे गोळा केले जात आहेत.(CCTVKeyEvidence ) विशेष न्यायाधीश एम.जी. चव्हाण यांनी ५ मेपर्यंत कोठडी सुनावली आहे.
कुटुंबाचा ठाम फटकार व राजकारण्यांना विनंती
पीडितेच्या वडिलांनी “फाशी होईपर्यंत राजकारणी घरी येऊ नये, तेव्हा भेटू” अशी स्पष्ट भूमिका घेतली. पत्नी-मुलानेही फाशीची मागणी केली असून पूर्वीच्या अत्याचारांचा उल्लेख केला.(BhimraoKamble)
भोर-राजगडमध्ये सलग बंद व आंदोलन
घृणास्पद कृत्याच्या निषेधार्थ रविवारी भोर व राजगडमध्ये कडक बंद पाळली गेली. (NasrapurMurder )भोर किराणा संघटना अध्यक्ष अनिल पवार यांच्या आवाहनाने ४०० दुकाने बंद राहिली. खेड शिवापूर टोलनाकावर टायर जाळून आंदोलन; आंबेडकरी कार्यकर्ते प्रवीण ओहाळ ताब्यात. (SITInvestigation)कापूरव्होळमध्ये गावदेवी उत्सव रद्द.(NoMobileAccused )
सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी व राष्ट्रीय दखल
तृप्ती देसाई यांनी पीडित आजी-आजोबांची भेट घेऊन “फास्ट ट्रॅक कोर्टात दररोज सुनावणी, एक महिन्यात सुप्रीम निकाल” मागणी केली. राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली असून पोक्सो कायद्यांतर्गत तपास जोरदार सुरू आहे.(POCSOCase)
न
