पुणे -प्रतिनिधी
पुण्याच्या कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील हवालदार गणेश शहाजी कस्पटे (GaneshKasapte) यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले होते , (Pune) आता परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी पोलीस हवालदार गणेश शहाजी कस्पटे यांना पोलिस दलातून तात्काळ निलंबित केले आहे.(KoregaonParkBribery)
लाचखोरीचा सिलसिला
कस्पटेने तक्रारदारांच्या मालकाला हैदराबाद कोर्टाच्या वॉरंटीवरील अटकेपासून वाचवण्याच्या निमित्ताने आधी ५ लाख रुपये बेडीच्या धाकाने उकळले होते. (CorruptCop )तडजोडीसाठी परत २ लाख रुपये मागितले असता दीड लाख रुपयांत सहमती झाली. बुधवारी लाच घेतानाच एसीबी पथकाने त्याला प्रत्यक्ष पकडले.(ACBRaid )
निलंबनाचे कारण व कारवाई
कस्पटे याने शासकीय सेवेत कर्तव्यसचोटी व कर्तव्यनिष्ठा राखली नाही, (PoliceSuspended)अशी बेजबाबदार वृत्तीमुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली असल्याचा ठपका ठेवून निलंबनाचे आदेश जारी झाले.(AntiCorruption) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
