पुणे -प्रतिनिधी
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.(JunnarChildMurder) सागर शिंदे (SagarShinde)
या विकृत तरुणाने आपल्या पोटच्या साडेतीन वर्षीय हर्षदाचा (HarshdaKilled) गळा दाबून क्रूर खून केला आणि ५ वर्षीय आर्यनला पुणे-नाशिक महामार्गावरील फॉरेस्टमध्ये सोडले. रडत असलेल्या मुलाच्या सांगण्याने हे प्रकरण उघडकीस आले असून आळेफाटा पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.(AryanSurvived )
६ मे रोजी संतवाडी फॉरेस्टमधून रडता आर्यन सापडला. त्याने पोलिसांना सांगितले की, “पप्पाने फिरायला जायचं म्हणून आम्हाला मोशीवरून घेऊन आलं आणि रात्री जंगलात सोडलं,(DeathPenaltyDemand) हर्षदा कुठे गेली माहित नाही.” आजोबा सदाशिव शिंदे यांना बोलावलं असता त्यांनी सागरचा शोध घेतला. चौकशीत सागरने मुलीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. ७ मे रोजी फॉरेस्टमध्ये हर्षदाचा मृतदेह सापडला आणि तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.(AlefataPolice)
आजोब्याची भावनिक फाशीची मागणी
सदाशिव शिंदे यांनी डोळ्यात अश्रू घालून म्हणाले, “एवढ्या लहान साडेतीन वर्षांच्या लेकराची हत्या केली, कचऱ्यासारखी फेकून दिली. आमच्या सैतान पोराला फाशावर लटकवा, तो सुटला नाही पाहिजे.(PuneCrime) उद्या आम्हाला घात करेल किंवा वाचलेल्या आर्यनलाही संपवेल.” खूनानंतर सागर दाढी व केस कापून पश्चातापविना घरी परतला होता, असंही त्यांनी सांगितलं.(FatherKillsDaughter )
सागरचं लव्हमॅरेज झालं होतं, पत्नीने ९ महिने पूर्वी मुलांना सोडून जाऊन पोलिस तक्रार दिली होती.(ForestMurder ) सागरने “पोरं नकोत” असं म्हटलं होतं. दोन लाख कर्ज, घराची जबाबदारी न सांभाळणं या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तपास करीत असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लहर उसळली आहे.(DepressionKilling)
