पुणे -प्रतिनिधी
पुण्याच्या फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘शादी.कॉम’ वेबसाइटवरून ओळख झालेल्या जोडप्याच्या लग्नानंतर विवाहितेला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.(FursungiDowryCase) २९ वर्षीय विवाहितेने (सह्याद्री हॉस्पिटल कर्मचारी, रा. फुरसुंगी) पती निहाल संजय जाधव, सासू अर्चना संजय जाधव, सासरे संजय जाधव, नणंद आसावरी रोहित वांजे व नणंदेचा पती रोहित वांजे (सर्व रा. लक्ष्मीनगर, पर्वती) यांच्यावर तक्रार दाखल केली आहे.(ShadiComWedding)
५ फेब्रुवारी २०२६ रोजी लोणी काळभोर येथे लग्न झाले.(NihalJadhav) लग्नानंतर सासू अर्चना यांनी ” मुलाला १५ तोळे सोने देणारे स्थळआम्ही नाकारलं तुम्ही तरी तेवढ द्यायचे होते , फ्रिज, वॉशिंग मशीन, ६५ इंच टीव्ही, चांदी भांडी, २ लाख रोख आण,” असं टोमणे मारत अपमानित केलं. नणंद-मेहुण्यांनी “हीला सोडून दे,” असं धमकावलं तर पती निहालने दारू पिऊन ५ मे रोजी मारहाण केली.(DowryTorture) फिर्यादीची आई या मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या असता सासू अर्चना संजय जाधव यांनी त्यांनाही मारहाण केली आहे.(InLawHarassment)
धक्कादायक बाब म्हणजे विवाहितेचे पती निहाल जाधव यांना बीपी आणि छातीच्या संसर्गाचा त्रास असल्याची माहिती लग्नानंतर समजल्याचा दावा करण्यात आला आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे .()PuneCrime
भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२ व ८५ अंतर्गत फुरसुंगी पोलिसांनी ५ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून यापूर्पवीच पतीवर ६ लाख रुपये
कर्ज असल्याच म्हटल आहे . आधीक तपास सुरू आहे.
