Pune :कौशल्यपूर्ण तपासाने उघडला खुनाच थरार… कसा तावडीत सापडला ब्युटी पार्लरचे काम करणाऱ्या तरुणीच्या खुनाचा मारेकरी ?

पुणे -प्रतिनिधी

पुण्याच्या मुंढवा पोलिस व गुन्हे शाखा युनिट-६ने केशवनगर कचरा डेपो रोडवरील ब्युटी पार्लर चालक आफरीन सलीम पठाण (२९, रा. वडगाव शेरी) याच्या खुनाचा छडा लावला लावण्यात यश मिळविले आहे गोरखनाथ देवराम शिंदे (४२, कॅबचालक, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) (GorakhnathShinde )याला अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .(MundhwaMurderCase) पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे .

आफरीन (AfrinPathan) या ब्युटी पार्लरचे चे काम करत असल्याने बाहेर जाण्यासाठी त्या कॅबसाठी आरोपी गोरखनाथ शिंदेच्या गाडीचा वापर करत असत. तेव्हा (CabDriverKiller)त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. अनैतिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. तिने गर्भपात करण्यासाठी शिंदे याच्याकडे १ लाख रुपये मागितले होते.त्यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागला. तिने त्याच्या घरी सांगण्याची धमकी दिली होती गर्भपातसाठी १ लाख मागितल्याने वाद वाढला व “तुझ्या घरी सांगेन” अशी धमकी दिली . घरी समजेल या भीतीने त्याने आफरीन पठाण चा खून केल्याचे कबुल केले .(AbortionDispute)

५ मे रात्री पावणे नऊ वाजता खराडी बायपास रिलायन्स मॉलजवळ कॅबमध्ये बसवून आव्हाळवाडीला नेलं व पैशाच्या वादातून गळा दाबून खून केला.(Keshwanagar ) ५० हजार रुपये घेऊन मृतदेह केशवनगर रस्त्यावर फेकून चंदननगरला पळाला.

आरोपीला कसे पकडले ?

बुधवारी रात्री कचरा डेपोजवळ मृतदेह सापडला, मुंढवा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनात पाठवला असता त्यात महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे समजले . तर घटनास्थळी आजूबाजूला सीसीटीव्ही नव्हते. पोलिसांनी तेथे येणार्‍या जाणार्‍या रोडवरील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यातून एक कॅब संशयास्पद वाटली. त्यावरून पोलिसांनी गोरखनाथ देवराम शिंदे (४२, कॅबचालक, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) ताब्यात घेतले .त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे काबुल केले . पी.नि. सागर गोडे व गुन्हे शाखेच्या पथकाने हा कौशल्यपूर्ण तपास केला .
अधिक तपास मुंढवा पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *