Pune Crime : पुण्यात खळबळ! डेक्कन परिसरात प्रसिद्ध उद्योगपतीने स्वत:ला संपवलं, हॉटेलमध्ये भयंकर अवस्थेत आढळला मृतदेह

पुणे : प्रतिनिधी

सॅलिसबरी पार्क परिसरातील ६१ वर्षीय उद्योगपतीचा मृतदेह शनिवारी दुपारी डेक्कन परिसरातील आपटे रोडवरील एका हॉटेलच्या खोलीत आढळून आला. (PuneMysteryDeath) शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या या उद्योगपतीच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.(DeccanHotel)

त्यांच्या कुटुंबीयांना शुक्रवारपासून संपर्क मिळत नसल्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.(SalisburyPark) शनिवारी दुपारी हॉटेल कर्मचाऱ्यांनी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. (PunePolice) त्यांनी सांगितले की, शुक्रवारी चेक-इन केलेल्या एका ग्राहकाने खोलीचा दरवाजा उघडत नाही असे दिसत आहे.(SuicideNote)

डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.(BusinessmanDeath) खोलीचा दरवाजा तोडून उघडल्यानंतर उद्योगपती मृतावस्थेत आढळले. खोलीत विविध ठिकाणी उलटीचे प्रमाण दिसून आले असून प्राथमिक तपासात विषप्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ PI गिरीशा निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,(PuneBreaking) परिस्थितीवरून हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. पोलिसांना खोलीतून एक चिठ्ठी सापडली असून ती उद्योगपतींनीच लिहिल्याचा संशय आहे. या चिठ्ठीत आर्थिक अडचणींचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *