Pune Crime : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘त्या’ सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; गुन्हे शाखेचा छापा

पुणे -प्रतिनिधी

पुणे-सातारा महामार्गावरील आंबेगाव परिसरातील “द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग”वर पुणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने आज संध्याकाळी छापा टाकला. (PuneCrime) या कारवाईदरम्यान चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली.(HumanTrafficking) या प्रकरणात एजंट सचिन बाबुराव गायकवाड (वय २८, रा. पानसरेनगर, कोंढवा, पुणे) याच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.(AmbegaonRaid)

लॉजमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. (PunePolice) वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलिस अंमलदार आंधळे, भिवरकर, केंदार व कोंडे यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या साहाय्याने माहितीची खातरजमा केली. त्यानंतर अचानक छापा टाकण्यात आला.(WomenRescue)

अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या सूचनांनुसार ही कारवाई यशस्वी झाली. (AntiTrafficking) छाप्यात लॉजमालिकाकडून महिलांना व्यापारीकरण केले जात असल्याचे उघड झाले.(CrimeNews

) पीडित महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *