पुणे – प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कामगार आघाडी) महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मारुती मोरे (४६, रा. कुरुळी, ता. खेड) यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास मोशी परिसरातील टोल नाक्याजवळ चाकूने हल्ला करून हत्या केली.(AnilMoreMurder) या प्रकरणात नितीन धोत्रे हा मूळ सूत्रधार असल्याची चर्चा आहे.(RPILeader) नागनाथ कुंडलिक चाटे (४३, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी खेड पोलिसांत फिर्याद दिली असून, तपास सुरू आहे.(MoshiMurder)
रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे नाव आणि आरपीआयचे सक्रिय नेते असलेले मोरे हे बांधकाम व्यवसायिक होते.(KhedPolice) त्यांच्यावर पक्षाने कामगार आघाडीची महाराष्ट्र जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या फॉरच्यूनर कारचा चालक कामानिमित्त बाहेर असल्याने मोरे स्वतः एका कामासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांना गाठून चाकूने भोसकून हत्या केली.
आमदार महेश लांडगे यांचे दु:ख व्यक्त
“अनिल मोरे यांच्या अकाली आणि अत्यंत दुःखद निधनाची बातमी वेदनादायक आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांवर, सहकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. (MaheshLandge)पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा करावी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा,” असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ तपास सुरू केला आहे .
