पुणे -प्रतिनिधी
अगदी किरकोळ कारणावरून उभा राहिलेला वाद कसा टोकाला जातो याचे ज्वलंत उदाहरण हडपसरमध्ये दिसून आले, (HadapsarIncident) आंब्याच्या पेटीच्या पैशांच्या वादातून पती-पत्नीतील वाद थेट मारहाणपर्यंत पोहचला अन हे प्रकरण गेले आणि थेट पोलीस ठाण्यात …(MinorIssueBigFight)
आंब्याची पेटी मागवल्यानंतर त्याचे पैसे देण्यावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीला मारहाण केल्याची घटना पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक घटना समोर येत आहे , (DomesticViolence)आयटी अभियंता असणाऱ्या पतीनं पत्नीला मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे .(MangoCrateDispute)
हडपसर पोलीस ठाण्यात ४२ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पती (वय ४७) साडेसतरानळी परिसरात पत्नीसमवेत राहतो आणि एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. २३ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सोसायटीसमोरील स्टॉलवरून ८५० रुपयांची आंब्याची पेटी मागवण्यात आली.(ITEngineerHusband) विक्रेत्याने घराजवळ आल्यावर पतीच्या मोबाईलवर ऑनलाईन पेमेंटसाठी स्कॅन कोड पाठवला. याच पैशांच्या भरण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला.(PuneNews)
वाद चिघळत जात असल्याचे पाहून संबंधित महिलेने मोबाईलवर संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण सुरू केले.(MaritalDispute) यामुळे संतप्त झालेल्या पतीने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि फेकून मारला. मोबाईल थेट महिलेच्या भुवईवर लागल्याने त्या जखमी झाल्या. तसेच आरोपीने तिला लाथ मारून शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी आयटी अभियंत्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
