Pune Crime : पतीच्या अंगात शिरलं संशायचं भूत ! पुण्यात पतीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा ; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

पुणे -प्रतिनिधी

पुण्यातील येवलेवाडीतून अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे .अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात 5 किलो वजनाचा गॅस सिलिंडर घालून तिची हत्या केली .घटना घडल्यानंतर आरोपी पती स्वतः येवलेवाडी पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.(WifeMurder) या कबुलीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .(DomesticViolence)

गीता जाधव (वय २६, रा. येवलेवाडी, मूळ गाव सातारा) असे मृत तरुणीचे नाव आहे,(YewalewadiCase) तर राजेंद्र जनार्दन करचे (वय ३१, रा. लेबर कॅम्प, मूळ गाव पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असा आरोपी पतीचा चे नाव आहे .(SuspicionOverCharacter)

मिळलेल्या माहितीनुसार . गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद सुरु होते .पती राजेंद्र हा गीता हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असत ,याच कारणावरून त्यांच्यात (LabourCampCrime)सतत वाद होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी पहाटे सुमारे पाचच्या सुमारास लेबर कॅम्पमधील घरात पुन्हा एकदा दोघांचे जोरदार भांडण सुरु झाले. या वादाचा राग अनावर न झाल्याने राजेंद्रने घरातील सुमारे पाच किलो वजनाचा गॅस सिलिंडर उचलून गीताच्या डोक्यावर घातला व तीचा त्यातच मृत्यू झाला.

, गीता जाधव या मूळ सातारा जिल्ह्यातील असून, यापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्या काही काळापासून राजेंद्रसोबत राहत होत्या. डिसेंबर २०२५ मध्ये दोघांनी घरच्या घरी विवाह केला होता. गीताने पहिले लग्न लपवले होते, तसेच ती इतर कोणाशी फोनवर बोलत असल्याचा संशय राजेंद्रला वाटत होता. याच संशयातून वारंवार वाद होत असत, आणि त्याचेच रूपांतर या घटनेत झाल्याचे तपासातून समोर आले आहे.

खुनानंतर राजेंद्रने घरातून बाहेर पडत खोलीला कुलूप लावले आणि तेथून निघून गेला. दिवसभर पुण्यात भटकंती केल्यानंतर शनिवारी सायंकाळी तो थेट येवलेवाडी पोलिस ठाण्यात गेला. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *