Pune Crime : दिसतं तसं नसतं ! हडपसरमध्ये जिम संस्कृतीच्या आड सुरु होता काळाबाजार ; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक सत्य उघड

पुणे -प्रतिनिधी

हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री (llegalDrugInjection) करणाऱ्या एका गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून (NarcoticsRaid) अटक केली आहे .(HadapsarCrime )

अटक केलेल्या आरोपीचे नाव अभिषेक खंडू भडंगे (वय २५, रा.हिंगणे मळा, हडपसर, पुणे) असे आहे . सदरील आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर हडपसर पोलीसस ठाण्यात ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. (RepeatOffender)
शहरात २४ मे रोजी पहाटेपर्यंत गुन्हे शाखेकडून राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. हिंगणे मळा परिसरात भाड्याने राहणाऱ्या या आरोपीकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(MephetermineSulfate)

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, (CrimeBranchAction) अभिषेक भडंगे हा हिंगणे मळा येथील आकाश डांग माळी यांच्या खोलीत भाड्याने राहतो. तो नशेसाठी वापरले जाणारे ‘मेफेनटरमाइन सल्फेट’ हे प्रतिबंधित इंजेक्शन विनापरवाना विकत असल्याची माहिती युनिट ७ चे सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे आणि खंडणी विरोधी पथक-२ चे पोलिस निरीक्षक राम राजमाने तसेच पोलिस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, किरण पड्याळ यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला.(PuneCrime)

पोलिसांची चाहूल लागताच अभिषेकने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला घटनास्थळीच पकडले. त्यानंतर त्याच्या खोलीची झडती घेतली असता मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण ८२ बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची किंमत सुमारे २८ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात संबंधित औषध कायदे व इतर कलमांअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बेकायदा औषध विक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, पुरवठा साखळी मागे कुणा डॉक्टर, केमिस्ट किंवा इतर व्यक्तींचा हात आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *