Pune Crime : पुण्यात देशी बनावटीचे गावठी कट्टे जप्त , एकाला बेड्या , पिस्तूल येतात कोठून ? पोलिसांकडून शोध सुरु

पुणे -प्रतिनिधी

पुण्याच्या सुदरनगर,(Sudarnagar) मांगडेवाडी, कात्रज परिसरात जवळ भारती विद्यापीठ पोलिसानी बनावटीचे कट्टे ( पिस्टल ) जिवंत काडतुसांसह हस्तगत केले आहेत.(BhartiVidyapeethPolice) याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे . (IllegalPistolSeized)

संबंधित संशयित आरोपींवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी सोहम धुमाळ वय १८ वर्षे ७ महिने, राहणार फ्लॅट क्रमांक २०३, पुण्यनगरी सोसायटी, आयप्पा मंदिराजवळ, कृष्णा इनक्लेव्ह, वडगाव-शेरी, पुणे येथील आहे . (ArmedYouthArrested)

मिळालेल्या माहितीनुसार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना गोपनीय बातमी मिळाली की सुदरनगर, मांगडेवाडी, कात्रज परिसरात अस्थायीरीत्या कोणीतरी अग्नीशस्त्र घेऊन उभा आहे. माहितीची खात्री करून पोलिसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली , आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले ,त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याचेकडे दोन पिस्टल व दोन जीवंत काडतुसे मिळून आली . अधिक तपास पोलीस करत आहेत . (PuneCrimeNews)

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या विशेष आदेशान्वये करण्यात आली असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक) राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त मिलींद मोहीते, तसेच विभागीय अधिकारी राहुल आवारे व सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण सावळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *