Pune Crime : ‘ पैसे दे नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करू ‘ भीती दाखवल्याने तरुणाची आत्महत्या ; तरुणीसह ते चौघे अटक

पुणे -प्रतिनिधी

खराडी भागात राहणाऱ्या करण बाळासाहेब कांबळे (KaranKambale) (वय 28, मूळ रा. खरबा, मानावत, जि. परभणी) यांनी 1 जूनला त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. करणच्या भाऊ कृष्णा कांबळे (वय 34) यांनी खराडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार हा निर्णय आरोपींच्या सततच्या धमक्यांमुळे करणने घेतला असल्याचे म्हटले आहे .

करण आणि प्रीती (: प्रीती अनिकेत बोढर्डे उर्फ रमिसा उर्फ माही, वय 31, रा. थिटे वस्ती, खराडी) (PreetiBodharde)यांच्यात लिव्ह‑इन रिलेशनशिप होते. प्रीतीचा दोनदा विवाह झाला असून, पतींसोबत न पटल्याने ती वेगळी राहत होती. ती आणि करण खराडीतील थिटे वस्ती परिसरात एकत्र राहू लागले. नंतर प्रीतीचा पहिला पती अनिकेत बोढर्डे (AniketBodharde)(वय 41, रा. जेघेनगर, बिबवेवाडी), तिची बहीण संस्कृती सुधीर रणदिवे (वय 25) (SanskritiRandeve)आणि भाऊ ऋतीक सुधीर रणदिवे (वय 26, दोघी रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) (RitikRandeve) यांनी करणला सतावून पैसे मागितले, असे फिर्यादीत म्हटले आहे (ChandrasenPalkar)

आरोपींनी पैसे न दिल्यास करणला बलात्काराच्या खटल्यात अडकविण्याची धमकी दिली. या सततच्या धमकीमुळे व नैराश्यामुळे करणने आत्महत्या केल्याचा ख्रुष्णा कांबळे यांनी आरोप केला आहे.(Kharadi)या फिर्यादीवरून खराडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हे शाखेने चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तिघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे तपास करत आहेत .(StopHarassment)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *