पुणे -प्रतीनिधी
पुण्यातील वाघोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे .लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (WagholiMurder)यानंतर तरुणीचा मृतदेह घरामध्ये ठेवून आरोपी पसार झाला होता पण पुणे पोलिसांनी आरोपीला परभणी येथून अटक केली आहे.(LiveInRelationship)
मृत तरुणीचे नाव रिहाना खातून असे आहे. (GirlfriendKilled) ती मूळची पश्चिम बंगाल राज्यातील असून काही महिन्यांपासून पुणे परिसरात राहत होती.(PuneCrime) या प्रकरणी रवी समीर वैराळ या 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. वाघोली पोलीस ठाण्यात तरुणीच्या नातेवाईकाने तक्रार दाखल केली आहे.(SuspicionOverCharacter)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी वैराळ (RaviVairal) हा प्लंबिंगचे काम करत होता. रवी आणि रिहाना हे गेल्या दीड वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वाघोलीतील एका इमारतीत नवीन भाड्याच्या घरात राहण्यास सुरुवात केली होती.(RihanaDeath)
मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घराला बाहेरून कुलूप असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. 1 जून रोजी घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला असता घरामध्ये रिहानाचा मृतदेह आढळून आला.(DomesticViolence)
तपासादरम्यान पोलिसांना रवी आणि रिहाना एकत्र राहत असल्याची माहिती मिळाली.(PoliceInvestigation) दोघांचेही मोबाईल फोन बंद असल्याने पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर आरोपी रवी परभणी येथे असल्याचे समोर आले.(CrimeNewsIndia) पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक तपासात चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी झालेल्या भांडणानंतर संतापाच्या भरात आरोपीने रिहानाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर घराला कुलूप लावून तो तेथून फरार झाला होता. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.
