Pune Crime : एका प्रश्नांनान संसार उध्वस्त ! सकाळीच दारू कशाला ? पत्नीन विचारल अन पतीने रागात विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या

पुणे -प्रतीनिधी

मध्यपानाचं व्यसन घर उध्वस्त करत याचंच प्रत्यय देणारी धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे .(ChinchwadIncident) दररोज मध्यपान का करताय , करू नका पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याचा राग अनावर झाल्यामुळे एका पतीने विषारी औषध पिऊन आपली जीवन संपवलं आहे.(AlcoholAddiction) या आत्महत्येच्या घटनेमुळे लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(FamilyDispute)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव अरविंद लक्ष्मण लोहार (ArvindLaxmanLohar) असे असून, त्यांना दारूचे प्रचंड व्यसन जडले होते.(PoisonConsumptionDeath) या कारणावरून घरात वारंवार वाद होत असत. नेहमीप्रमाणे अरविंद यांनी दारू पिण्याचा हट्ट धरला असता त्यांच्या पत्नीने त्यांना नकार दिला. यावरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात अरविंद यांनी विषारी औषध प्राशन केले.(PunePCMCNews)

काही वेळातच त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली.(DomesticTension) ते वेदनेने तडफडू लागल्याचे पाहताच पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले.(UnnaturalDeathCase) डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले, मात्र शरीरात विष मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.(CrimeNewsIndia)

घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पत्नीच्या जबाबावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, (SocialAwareness) कौटुंबिक वादातूनच हा टोकाचा निर्णय घेण्यात आला की यामागे इतर काही कारण आहे, याचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *