पुणे – प्रतिनिधी
वानवडी परिसरातील ग्रँड स्केअर सोसायटी येथे माहेरहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने एका विवाहितेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे.(Wanawadi) या प्रकरणी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Hadapsar)
आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव लक्ष्मी मारुती मिरेकर (Laxmi Mirekar)(वय ३३) असे असून, तिच्या भावाने विठ्ठल अंबादास शिंदे (वय ३१, रा. भोसरी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादीनुसार, पती मारुती सावळा मिरेकर (Maruti Mirekar)(वय ३६) आणि सासू नागू सावळा मिरेकर (वय ६०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० जून रोजी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान हडपसर येथील ग्रँड स्केअर सोसायटीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि मारुती यांचा २००८ मध्ये विवाह झाला असून त्यांना दोन मुले आहेत.(Violence Against Women) लक्ष्मी या धुणी–भांडी करण्याचे काम करत होत्या, तर मारुती कोणताही ठराविक कामधंदा करत नसल्यामुळे तो वारंवार माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत असे.(DomesticAbus) याशिवाय धोड्यांच्या महिन्यात भावाकडून एक तोळ्याची सोन्याची अंगठी आणण्याची मागणी करूनही तिच्यावर मानसिक छळ होत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सततच्या छळाला कंटाळून लक्ष्मी यांनी सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्या शेजारच्या इमारतीच्या छतावर पडल्याने गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वानवडी पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
