पुणे -प्रतिनिधी
आजच्या तरुण पिढीसमोर शिक्षण असूनही मनासारखी नोकरी न मिळणे आणि वाढत्या वयात लग्न न जमणे, ही गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे. याच दडपणाचा एक हृदयद्रावक आणि धक्कादायक नमुना मावळ तालुक्यात समोर आला आहे.वय वाढत असताना लग्न जमत नाही आणि हातात स्थिर, समाधानकारक नोकरी नाही, या दुहेरी विवंचनेतून ३२ वर्षीय तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. मानसिक तणावाखाली असलेल्या या तरुणाने आपला आत्महत्येचा विचार नातेवाईकांसमोरही व्यक्त केला होता, असे समजते.(MarriagePressure)
मृत तरुणाचे नाव परमेश्वर रामेश्वर कुरे (Parmeshwar Kure)(वय ३२) असे असून ते सध्या देहूगाव येथे वास्तव्यास होते. ते मूळचे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील आलापूर येथील रहिवासी होते. (Dehugaon)भंडारा डोंगर परिसरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह दिसल्याने नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.(Bhandara Dongar)
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर हे सुशिक्षित असूनही त्यांना बराच काळ स्थिर आणि मनासारखी नोकरी मिळत नव्हती. रोजगार नसल्यामुळे ते आर्थिक तसेच मानसिक तणावाखाली होते. याशिवाय वय वाढत असतानाही विवाह जुळत नसल्याने त्यांची चिंता आणखी वाढली होती.(Maval Taluka)
नोकरी न मिळणे आणि वारंवार प्रयत्न करूनही लग्न न जुळणे या कारणांमुळे ते नैराश्यात गेल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. काही दिवसांपूर्वी त्यांनी जवळच्या नातेवाईकांकडे आयुष्याबाबत निराशा आणि आत्महत्येचे संकेत देणारे विचार व्यक्त केल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत .(Pune Rural Crime)
