Pune Crime : घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे -प्रतिनिधी

पुणे , पिंपरी चिंचवड , सांगली व गुजरात राज्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ने सापळा रचून जेरबंद केले आहे .आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे .

धनंजय हरीष काळे वय २१ वर्षे, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव, पिंपरी, पुणे २) यश उर्फ गट्या दत्ता देशमुख वय १९ वर्षे, रा. आदर्श हॉटेलजवळ, भारतनगर, पिंपरी , मोहन नागनाथ नवले, वय ३९ वर्षे, रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी रेल्वे स्टेशनचे शेजारी, पिंपरी, पुणे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .व एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले आहे .

याबाबत माहिती अशी कि काही दिवसांपासून जिल्ह्यातील घरफोडी च्या घटनेत वाढ होत असून कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २२८/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३(५)) च्या तपासादरम्यान दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. (Pune News)

तसेच पोलीस अंमलदार महेश पाटील यांनी डंप डेटाचे तांत्रिक विश्लेषण केले, तर सहायक पोलीस निरीक्षक नाथा भुजबळ यांनी फिंगरप्रिंटच्या आधारे महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली. त्यातून आरोपींची ओळख पटली. (Pune News)

त्यानंतर पोलीस अंमलदार साई कारके व महेश पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रेंजहिल्स, खडकी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. (Pune News)

चौकशीत आरोपींनी कोथरूडसह विविध भागात घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरीचा माल मोहन नागनाथ नवले (३९), रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी आणि मतीन कुरेशी, रा. काळेवाडी, पिंपरी यांच्या माध्यमातून विकल्याची माहिती दिली. (Pune News)

त्यानंतर मोहन नवले याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा एकूण ११.११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune News)

दरम्यान, पोलीस तपासात आरोपींनी कोथरूड पोलीस ठाणे, बिबवेवाडी पोलीस ठाणे, सहकारनगर पोलीस ठाणे, दिघी पोलीस ठाणे, संजयनगर पोलीस ठाणे (सांगली), वापी पोलीस ठाणे, वलसाड (गुजरात) या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याचे समोर आले आहे. (Pune News)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके आणि पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे तसेच पोलीस अंमलदार साई कारके, महेश पाटील, साधना पवार, अमित गद्रे, बाळू गायकवाड, रविंद्र लोखंडे, अजित शिंदे, प्रदीप राठोड, गणेश ढगे आणि शिवाजी सातपुते यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. (Pune News)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *