पुणे -प्रतिनिधी
सर्व सरकारी विभाग , खास करून पोलिस विभागावर लाच खोरीचा सातत्याने आरोप केला जातो , (Corruption) सर्वच पोलिस अधिकारी लाचखोर नसतात , पण काहीजण लाच घेतात ,यातील काही पकडले ही जातात सध्या अशाच एका लाचखोर पिंपरी चीचवड मधील महिला पोलिस अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 3 लाखांची लाच घेताना रांगेहाथ पकडल आहे ,(Dighi Police)
लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव चैताली बाळासाहेब गपाट (PS Chaitali Gapat) (वय ३५, रा. मांजरी) असे आहे.
माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत महिला उपनिरीक्षक PSI चैताली गपाट यांना दाखल गुन्ह्याचा अंतिम अहवाल तक्रारदारांच्या बाजूने देण्याच्या मदतीसाठी थेट ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले आहे. तक्रारदारास एवढी मोठी रक्कम देण्याची अडचण आल्याने त्यांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार नोंदवली.(Pimpri Chinchwad)
तक्रार मिळताच भ्रष्टाचारविरोधी पथकाने दिघी पोलीस ठाण्यात सापळा रचून कारवाई केली. ठरलेल्या नियोजनानुसार तक्रारदाराने लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३ लाख रुपये घेऊन पोलीस ठाण्यात आलो. (Caught RedHanded) PSI चैताली गपाट यांनी ही रक्कम स्वीकारताच तिथुन दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आणि ताब्यात घेतले.
आपल्या पोलीस ठाण्याच्याच अखत्यारात महिला उपनिरीक्षक पकडल्याने दिघी पोलीस ठाण्याचे इतर कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर पीएसआय चैताली गपाट यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे औपचारिक काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
