पुणे – प्रतिनिधी
पुण्यातील यवत पोलीस ठाण्याच्या (Yavat Police) जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने प्रियकरासोबत राहण्यासाठी घर सोडल्याच्या रागातून हा भीषण प्रकार घडल्याचे तपासात समोर आले आहे.
हि घटना ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बोरीभडक गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गाच्या सोलापूरकडे जाणाऱ्या लेनपासून सुमारे १५० मीटर अंतरावरील मोकळ्या जागेत ही घटना घडली आहे .(Daund Taluka)
मृत तरुणीचे नाव आचल यादव (Achal Yadav) (वय अंदाजे १८) असे असून, खून केल्याच्या प्रकरणी आरोपी शंकर बकस सिंग (Shankar Bakas Singh)(वय २२, रा. खवपुर, जि. अमेठी, उत्तर प्रदेश) याला यवत पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी रोहन मच्छिंद्र गवळी यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आचल पतीला सोडून रोहन गवळी याच्यासोबत राहत असल्याचा राग आरोपीच्या मनात होता. यामुळे त्याने शिवीगाळ, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत आचलच्या डोक्यात दगड मारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपीला न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर माने करीत आहेत.
