पुणे -प्रतीनीधी
लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून केतन अग्रवाल (Ketan Agarwal ) यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना महत्त्वाचे धागे मिळाले आहेत. तपासातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रत्यक्षदर्शीचा २३ जून रोजी नोंदवलेला जबाब आणि मोठ्या प्रमाणावर जप्त केलेला डिजिटल डेटा या दोन कड्या तपासासाठी निर्णायक ठरत आहेत.(Pune Crime)
प्रत्यक्षदर्शीने गडावर केतन आणि सिया यांना एकत्र पाहिल्याचे सांगितले; त्यांच्या मागून चेतन येत होता. उन्हाळ्यातही चेतनने हुडी घातल्याने प्रत्यक्षदर्शीचे लक्ष गेले होते. पुढे गेल्यानंतर सियाने चेतनच्या दिशेने इशारा केला आणि त्यानंतर ती खाली बसल्याचे प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले.(Crime Investigation)
त्याच वेळी चेतन मागून धावत आला आणि त्याने केतनला दरीच्या दिशेने ढकलल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीने केला आहे. घटनेबाबत विचारणा केल्यानंतर आपल्यालाही किल्ल्यावरून फेकून देण्याची धमकी देण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या प्रत्यक्षदर्शीने काही काळ कोणालाही माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे.(Digital Evidence)
तसेच, तिसऱ्या आरोपी रितेश हंगे याच्या मोबाईलमधील डिलीट चॅटमधून काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. (Eye witness ) डिलीट चॅटमधून हत्येच्या कटाचे बारकावे समोर आले असून, गुन्ह्यापूर्वी सिया, चेतन आणि रितेश यांच्यात स्पष्ट चर्चा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मात्र या सर्व बाबी तपासाचा भाग असून त्यांची कायदेशीर पडताळणी होणे बाकी आहे. प्रत्यक्षदर्शीचा जबाब आणि डिजिटल पुरावे यांची सांगड घालून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात ५,०५३ पानांचे आरोपपत्र वडगाव मावळ न्यायालयात दाखल केले आहे.(Chetan Chaudhari )
