पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील लोणीकंद Lonikand पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे .हवेली तालुक्यातील कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर Sachin Lonkar हे ऑफिसमधून बाहेर पडताच त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन गायकवाड आणि आकाश अडसुळे हे दोघे कोयते घेऊन लोणकर यांच्या दिशेने धावत आले. हल्लेखोर येत असल्याचे लक्षात येताच लोणकर यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यानंतर लोणकर यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्याच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.Pune Crime
दरम्यान, या हल्ल्यापूर्वी दोन दिवस गजानन गुलाब गायकवाड याने लोणकर यांची गाडी अडवून चार ते पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. बंदुकीचा धाक दाखवत, “तुझा सप्लायरचा व्यवसाय चांगला चालतो, पैसे देण्यात अडचण काय,” असे म्हणत पैसे मागितल्याची माहिती आहे.
या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खंडणी मागणे, जीवघेणा हल्ला करणे आणि वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींचा पूर्वइतिहास आणि इतर व्यक्तींचा सहभाग याचा तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
