पुणे -प्रतिनिधी
कॉलेजला जाते सांगून घराबाहेर पडलेली २२ वर्षीय तरुणी घरी परतलीच नसल्याची घटना घडली आहे .हि घटना 1 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .Missing Girl
या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात Fursungi Police मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे .
फुरसुंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , लोणी काळभोर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याची २२ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे , तक्रारीनुसार तरुणी १ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी आलीच नाही ,कुटुंबीयांनी तिचा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच फुरसुंगी, हडपसर Hadapsar , उरुळी देवाची Uruli Devachi आणि लोणी काळभोर परिसरात शोध घेतला मात्र तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
दरम्यान, बेपत्ता २२ वर्षीय तरुणीने आई, भाऊ आणि बहिणीला ई-मेल केल्याचे तिच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. या ई-मेलमध्ये ती रोहित वाघमोडे Rohi tWaghmode याच्यासोबत जात असून, त्याच्याशी विवाह करणार असल्याचे म्हटल्याची माहिती समोर आली आहे .Pune News
या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी रोहित वाघमोडे याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी नोंद घेऊन तरुणीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत .
