पुणे -प्रतिनिधी
कॉलेजला जाते सांगून घराबाहेर पडलेली २२ वर्षीय तरुणी घरी परतलीच नसल्याची घटना घडली आहे .हि घटना 1 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली . या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .Missing Girl
या प्रकरणी फुरसुंगी पोलीस Fursungi Policeठाण्यात मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे .
फुरसुंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , लोणी काळभोर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याची २२ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे , तक्रारीनुसार तरुणी १ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी आलीच नाही ,कुटुंबीयांनी तिचा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच फुरसुंगी, हडपसर Hadapsar , उरुळी देवाची Uruli Devachi आणि लोणी काळभोर Loni kalbhor परिसरात शोध घेतला मात्र तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
दरम्यान, बेपत्ता २२ वर्षीय तरुणीने आई, भाऊ आणि बहिणीला ई-मेल केल्याचे तिच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. या ई-मेलमध्ये ती रोहित वाघमोडे Rohit Waghmode याच्यासोबत जात असून, त्याच्याशी विवाह करणार असल्याचे म्हटल्याची माहिती समोर आली आहे .
या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी रोहित वाघमोडे याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी नोंद घेऊन तरुणीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत .
