पुणे – प्रतीनिधी
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील Pimpari Chinchwad News हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे . गर्लफ्रेंडलने बोलणे बंद केले आणि लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या बॉयफ्रेंडने तिला गाठून भररस्त्यात चाकूने सपासप वार करून हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे . Love Dispute यानंतर आरोपीने स्वतःहि विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला . Pune Crime
हिंजवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली असून , आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तरुणी आणि आरोपीचे मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध सुरु होते . तर तरुणी हिंजवडीतील एका कंपनीत जॉब करते ,नेहमी प्रमाणे ती सोमवारी बहिणीसोबत कामावर जात असताना आरोपीने तरुणीला आडवले ‘तुझ्यामुळे मला कामावरून काढून टाकले आहे. तू माझ्याशी का बोलत नाहीस? आपण लग्न करू,’ असे आरोपीने तिला म्हटले .परंतु तरुणीने त्याच्या सोबत लग्न करण्यास साफ नकार दिला . चिडलेल्या आरोपीने तरुणीला खाली पाडले आणि तिच्या छातीवर, पाठीवर तसेच हातावर धारदार चाकूने सपासप वार करत केले या हल्ल्यात तरुणी जखमी झाली. Boyfriend Attack
त्यांनतर आरोपीनेही स्वतः उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास फौजदार ताकतोडे करीत आहेत.
सकाळी कॉलेजसाठी निघाली , संध्याकाळपर्यंत घरी आली नाही ! लोणी काळभोरमधील पोलीस कर्मचाऱ्याची २२ वर्षीय मुलगी बेपत्ता … फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार
