पुणे -प्रतिनिधी
मुलगी ही घराची लक्ष्मी असते, पण संकटकाळी ती खरी रक्षक ठरते,” हे म्हणून खरी प्रचीती ‘बापू’ म्हणून ओळखले जाणारे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) व त्यांची डॉक्टर कन्या ममता (Dr Mamta Shivtare )यांच्या नात्यातून घडली. किडनी फेलियरमुळे नियमित डायलिसिसवर असलेल्या शिवतारे यांना मुंबईतील नामांकित रुग्णालयात ममतेच्या किडनी प्रत्यारोपणाने नवसंजीवनी मिळाली.
संकटकाळी धाडसी निर्णय
गेल्या काही महिन्यांपासून विजय शिवतारे यांच्या दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले होते. (Father Daughter Bond)प्रकृती खालावत असताना पाच वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यातही ममता मदतीला धावल्या होत्या. यावेळी स्वतःची किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेऊन त्यांनी वडिलांना पुन्हा आयुष्य दिले. आज पार पडलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून दोघांची प्रकृती स्थिर आहे.(Kidney Donation)
राजकीय कारकीर्द आणि कौतुकाची लहर
शिवसेना नेते विजय शिवतारे हे २००९ व २०१४ मध्ये पुरंदरमधून सलग विजयी झाले. २०१९ च्या पराभवानंतर २०२४ मध्ये दणकाम मारत पुन्हा आमदारपद मिळवले.(Purandar MLA) जलसंपदा राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. ममता शिवतारे लांडे (डॉ. ममता) यांच्या या त्यागाचे सोशल मीडियावरून राज्यभरातून कौतुक होत असून बाप-लेकीचे हे नाते प्रेरणादायी ठरले आहे.(Organ Donation)
कुटुंबीय व समर्थक सुटकेचा निश्वास
शस्त्रक्रियेनंतर रुग्णालय प्रशासनाने दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे जाहीर केले. शिवतारे कुटुंबीय व पुरंदरमधील समर्थकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ममता यांच्या या पराकोटीच्या प्रेमाने केवळ कुटुंब नव्हे तर संपूर्ण समाजाला बाप-लेकीच्या नात्याची खरी ओळख पटली.
