पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील चंदननगर परिसरात हुंड्याच्या आणि पैशांच्या सततच्या मागण्यांना कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. (ChandanNagar Police Station) कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, सततचा मानसिक व शारीरिक छळ या टोकाच्या निर्णयाला कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव तेजस्विनी गोरख सोनवणे (Tejaswini Gorakh Sonawane)असे आहे. तिचा विवाह २५ जून २०२० रोजी झाला होता आणि या दाम्पत्याला अडीच वर्षांची मुलगी आहे. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी, नंतर सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी व विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. (Husband In Laws Booked)चारचाकी, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि इतर वस्तूंच्या मागण्या होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मागण्या न मान्य केल्यास तेजस्विनीवर शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप आहे.
एप्रिल २०२६ मध्ये फ्लॅट खरेदीसाठी ३ लाख रुपयांची मागणी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तसेच अधिक मासानिमित्त आयोजित ‘धोंडा’ जेवणासाठी येण्यापूर्वी सोन्याची अंगठी देण्याची अट सासरच्या मंडळीांनी घातली, अशीही तक्रार आहे. अंगठी दिल्यासच जेवणाला येऊ, अन्यथा येणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले गेले. त्यानंतर झालेल्या जेवणाच्या कार्यक्रमातही तेजस्विनीचा सार्वजनिक अपमान झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.(Domestic Abuse Case)
सततच्या या त्रासामुळे तेजस्विनी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. २ जून २०२६ रोजी रात्री तिच्या पतीने माहेरच्या नात्यांना फोन करून ती खोलीचे दार उघडत नसल्याची माहिती दिली. काही वेळानंतर तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, तेजस्विनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत
