पुणे -प्रतीनीधी
शहरात काही दिवसांपूर्वी वैष्णवी हगवणे आणि हडपसर येथील हुंडाबळीच्या घटनांमुळे राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता. असं असताना पुण्यातील काळेपडळ (Kalepadal) येथे अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरकडून पाच लाख रुपये आणावेत अशी मागणी करत सातत्यानं छळ केल्यानं अवघे साडेचार महिने पूर्ण झालेल्या आयटी इंजिनियर विवाहितेनं राहत्या घरी जीवन संपवलं (Dowry Death)
ही घटना गुरुवारी रात्री घडली असून वैष्णवी ओंकार गिसरे (Vaishnavi Gisare) (वय २३, रा. वृंदावन सोसायटी, वडाचीवाडी, पुणे) असं जीवन संपवलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी मृत वैष्णवीचा पती ओंकार संजय गिसरे (वय २८), सासरे संजय महादेव गिसरे (वय ४९) व सासू रुपाली संजय गिसरे (वय ४२; सर्व रा. वृंदावन सोसायटी, वडाचीवाडी, पुणे) यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायदा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत तिचे वडील प्रवीण रघुनाथ जरांडे (वय ५१, रा. कोडीत खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Women Harassment)
मिळलेल्या माहितीनुसार , साडेचार महिन्यांपूर्वी म्हणजेच ९ मे रोजी वैष्णवीचा विवाह ओंकार संजय गिसरे याच्याशी मोठ्या थाटामाटात झाला होता. विवाहादरम्यान मुलीच्या वडिलांनी सुमारे ४० ते ४५ लाख रुपये खर्च करून १० तोळे सोने आणि दुचाकी दिली होती. मात्र, लग्नाच्या अवघ्या महिन्याभरातच सासरच्या मंडळांनी नवीन चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी वैष्णवीने माहेरहून ५ लाख रुपये आणावेत असा तगादा लावला होता. त्यावरून तिचा सातत्यानं मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. शेवटी या छळाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचललं.(Breaking News Marathi )
तसंच मृत वैष्णवी ही गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत वैद्यकीय व अधिकृत पुष्टी होईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी पती ओंकार संजय घिसरे याच्यासह सासू व सासरा अशा तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे.
