पुणे : प्रतीनिधी
शहरातील फुरसुंगी परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरला असून,(FursungiMurder) एका 26 वर्षीय तरुणाची टोळक्याकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय 26) (RanaMore) याच्यावर त्याच्याच ओळखीतील तरुणांच्या टोळक्याने जुन्या वादाच्या रागातून प्राणघातक हल्ला केला. देशमुख पेट्रोल पंपाच्या मागील परिसरात ही घटना घडली. आरोपींनी लोखंडी धारदार हत्याराने डोके, मान, चेहरा आणि हातावर सपासप वार करत त्याला ठार मारले.
आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ओमकार प्रमोद मोरे (वय २३), अरूण अनिल यादव (वय २०), (ArunYadav)आदित्य ज्ञानेश्वर पिंपळेकर (वय २१)(AdityaPimplekar) दत्ता वेंकट गीते (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.(OmkarMore) तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला पकडले आहे. आदित्य प्रकाश कांबळे याच्यासह इतर आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. याबाबत फुरसुंगी पोलिस ठाण्यात रेखा प्रभाकर कांबळे (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे.(JuvenileKiller )
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यात एक विधीसंघर्षित बालकही सहभागी असल्याचे समोर आले आहे, जे अधिक धक्कादायक आहे.(PetrolPumpAttack)
घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असली,(PuneCrime) तरी स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “परिसरात गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांचे नियंत्रण कमी पडत आहे. वेळेवर कारवाई झाली असती, तर हा खून टाळता आला असता,” असा संतप्त सूर नागरिकांनी व्यक्त केला.
फुरसुंगी आणि हडपसर परिसरात वाढती टोळक्यांची दादागिरी, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे ओढा आणि पोलिसांचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये दिसणारा ढिसाळपणा यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(GangMurder)
