Pune Crime : किरकोळ वाद, भररस्त्यात गाठलं; डोक्यात सिमेंटचा गट्टा घालत केली हत्या … चौघे अल्पवयीन पोलिसाच्या ताब्यात

पुणे -प्रतिनिधी

एकमेकांकडे बघण्याच्या वादातून १८ वर्षीय नयन सचिन जाधव याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू (CementBlockAttack ) घालून तीक्ष्ण शस्त्राने खून केल्याची घटना धनकवडी आंबेगाव पठारात घडली.(AmbeGaonMurder) भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून बालन्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात रवानगी केली आहे.(DhankawdiCrime)

दोन दिवसांपूर्वी नयन व आरोपी अल्पवयीनांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. सोमवारी (४ मे) रात्री ९:३० च्या सुमारास निलगिरी चौकात नयन थांबला असता शिवीगाळ करून डोक्यात सिमेंट गट्टू मारला व तीक्ष्ण शस्त्राने निर्घृण हल्ला केला. गंभीर जखमी नयनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नयनच्या (NayanJadhav )आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चार अल्पवयीनांना पसार होण्यच्या प्रयत्नात असताना , पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सचिन सरपाले, मितेश चोरमोले यांना त्यांचे गुप्त बातमीदरामार्फत बातमी मिळाली की, विधिसंघर्षित बालक (MinorAccused) त्याचे साथीदारांसह सातारा रोडवरील वेळु गावाजवळ थांबले आहेत बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून अटक केली .

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. राजेश बनसोडे मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, श्री. मिलिंद मोहीते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. कैलास कोडग यांचे सुचनाप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, मिथुन परदेशी,(BharatiVidyapeethPolice ) पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, प्रियंका निकम, पोलीस अंमलदार सचिन सरपाले, मितेश चोरमोले, महेश बारवकर, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, संदीप आगळे तसेच अवधुत जमदाडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *